ब्रिटनमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. करोना लसीकरण आणखी वेगाने सुरू करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, आपल्याला अधिकाधिक ४० वर्षावरील व्यक्तींना करोना लशीचा दुसरा डोस द्यायचा आहे. जेणेकरून करोनापासून त्यांचा आणखी बचाव होऊ शकतो. ब्रिटनमध्ये येत्या काही आठवड्यात रुग्णालयात डेल्टा वेरिएंट बाधित मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. ब्रिटनमध्ये रविवारी ७४९० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, आठ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठवड्यात त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत ४९ टक्के वाढ दिसून आली.
वाचा:
वाचा:
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आणखी तीन आठवडे निर्बंध लागू केल्यामुळे ब्रिटनमध्ये ‘फ्रीडम डे’ १९ जुलै साजरा करण्यात येणार आहे. लॉकडाउन संपुष्टात आल्याच्या आनंदात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जॉन्सन यांनी सांगितले की, १९ जुलै रोजी निर्बंधाचा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे आणखी काही दिवस प्रतीक्षा करणे योग्य राहिल असेही त्यांनी म्हटले.
वाचा:
युरोपमध्ये डेल्टा वेरिएंटची लाट?
जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वीच युरोपमध्ये डेल्टा वेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा इशारा दिला होता. अनेक युरोपीयन देशांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे डेल्टा वेरिएंटमुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times