मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे. देशद्रोहाच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने पासपोर्ट नुतनीकरणास पारपत्र प्राधिकरणानं नकार दिल्यानं कंगनानं कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. ( moves hc)

ट्विटरच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोप कंगनावर करण्यात आला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याकारणामुळं पारपत्र प्राधिकरणाने कंगनाचा पासपोर्टचे नुतनीकरण करण्यास नकार दिला होता.

कंगनानं पारपत्र प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून पासपोर्ट नुतनीकरण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. कामानिमित्त मला देशाबाहेर प्रवास करावा लागतो. एका चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत आहे. त्यासाठी चित्रीकरणासाठी देशाबाहेर जावे लागते. जून ते ऑगस्टदरम्यान हंगेरी व बुडापेस्टा या देशात चित्रीकरणासाठी जायचं आहे, असं म्हणण कंगनानं याचिकेत मांडलं आहे. तसंच, सप्टेंबर २०२१मध्ये पासपोर्टची मुदत संपत असल्याचंही तिनं म्हटलं आहे. त्यामुळे तिने पारपत्र कार्यालयाने पासपोर्टचं नुतनीकरणं करावं, यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

वाचाः

१५ जूनला सुनावणी

चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात करण्यात येणार आहे. ते लोकेशन बुक करण्यासाठी निर्मात्यांनी पैसे खर्च केले आहेत. तिथं अभिनेत्री म्हणून उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळं कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरण होण महत्त्वाचं आहे. कंगनाच्या या याचिकेवर आज १५ जून रोजी सुनावणी आहे.

वाचाः

ऑक्टोबर २०२०मध्ये तक्रार केली होती दाखल

व रंगोली चंडेलविरोधात १७ ऑक्टोबररोजी वांद्रे पोलीस ठाण्यात मुन्नावराली सैय्यद यांनी धार्मिक भावना दुखावणे, देशद्रोह विरोधात गुन्हा दाखल केला होता. कंगनानं हा गुन्हा रद्द होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here