मुंबई: नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातून सुटल्यावर मिरवणुकीनं घरी परतणारा कुख्यात गुंड याला मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा फटकारलं. ‘तुरुंगातून सुटणं ही मोठी कामगिरी आहे का आणि गजा मारणे हा सेलिब्रिटी आहे का?,’ असा संतप्त सवाल न्यायालयानं केला. (Bombay High Court Slams Gangster )

पुणे शहरासह जिल्ह्यात २४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या गजा मारणे याची मागील वर्षी तुरुंगातून सुटका झाली होती. सुटकेनंतर तळोजा कारागृहातून घरी परतताना अक्षरश: त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात अनेक जण सहभागी झाले होते. या मिरवणुकी प्रकरणी पुन्हा एकदा गजा मारणेवर गुन्हा दाखल झाला व त्याच्यासह १०० जणांना अटक करण्यात आली होती. गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिनं या कारवाईविरोधात अर्ज दाखल करून गजा मारणेच्या सुटकेची मागणी केली आहे.

वाचा:

त्या अर्जावर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘गजा मारणे हा सेलिब्रिटी आहे का? लॉकडाऊन असताना, करोनामुळे अनेक निर्बंध असताना, सुरक्षित वावर राखणे आवश्यक असताना अशाप्रकारे मिरवणूक काढणे शोभते का? तुरुंगातून सुटणं ही मिरवणूक काढण्याजोगी कामगिरी आहे का? करोनाच्या संकट काळात नियम पाळण्याऐवजी अर्जदार मिरवणूक काढतात, हे आश्चर्यकारक आहे,’ अशा शब्दांत खंडपीठानं गजा मारणे याला फटकारले.

गजा मारणेच्या सुटकेच्या अर्जाविषयी राज्य सरकारला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्या, असे निर्देश खंडपीठानं सरकारी वकील माधवी म्हात्रे यांना दिले आणि सुनावणी तहकूब केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here