अमरावतीः राज्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची सुरू झाली. अशातच मेळघाट सारख्या दुर्गम भागात सध्या एक उत्सव सुरू आहे. या उत्सवाला काही धार्मिक कारण नसून पर्यावरणा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एखाद्या सणाप्रमाणे करण्यात येणारा भवई उत्सवात सध्या आदिवासी मग्न आहेत.

शेतात पेरणी करण्यापूर्वी शेतकरी पूजा करतात. मेळघाटमध्ये पावसाळा आला की, आदिवासी बांधवांच्या नववर्षाला सुरवात होते. मेळघाटात होणारी भवाई पूजा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात असल्याचे येथील आदिवासी मानतात. भवाई पूजेदरम्यान गावातील खेडा मुठवा (पूर्वजांची दगडात कोरलेली प्रतिमा ) येथे बांबूच्या काठीचे बियाण्याचे पूजन होते. लहानांपासून मोठी माणसेही या उत्सवात सहभागी होतात. शेती कामाची मजुरी ठरवली जाते. वर्षभराची परिस्थिती कशी असेल? यावर चर्चा केली जाते.

बाश्याच्या पेरातून एकमेकाला घासून अग्नी निर्माण केला जातो. व प्रत्येक घरी हा अग्नी नेऊन मग चुली पेटवल्या जातात. त्यावर स्वयंपाक केला जातो. घरात गोड शेवळ्या खाल्या जातात. गाव गाडा कसा चालवावा याबाबत चर्चा केली जाते. लहान मुले मोठ्या माणसांचे पात्र करत भूमकाने दिलेली सर्व पिकांचे बीज पेरणी करतात. नव्या पिढीला या निमित्ताने शेतीचा संस्कार शिकवला जातो.

वाचाः

भवाई पूजा, निसर्ग पूजा यात जंगलाप्रती, वृक्षाप्रती आदर व्यक्त केला जातो, त्याचे पूजन केले जाते. तर निमित्ताने रोप लागवडीचा विचार रुजविण्यासाठी आंबा, मोहा, बास, जांभूळ आवळा ही रोपे देण्यात येतात. लोकांनी ही रोपे शेतीच्या धुऱ्यावर लावण्याचे आव्हान शेतकरी करतात. कासाईखेडा गावच्या भवाई पूजेत एक नवा विचार, नवी कृती लोकांच्या मनात रुजवली जाते. जंगलातील झाडांचे बियांचे पूजन गावच्या भवाई पूजेत केले जाते आणि त्यांची वन मजुरांच्या साहाय्याने बीज संकलनाची सुरवात केली जाते.

वाचाः

मोहा, जांभूळ, चारोळी, आंबा, कडाई, आजन, कडुनिंब, बोर, आवळा, चिंच आशा महत्वाच्या प्रजाती बिया गोळा केल्या. गाव पंचायत प्रमुख गावकरी यांनीही ह्या बियांचे पूजन केले. शेतीच्या बियाण्यांची पूजा तर आपण करतोच. झाडांच्या बियांचीही पूजा केली पाहिजे. त्यातून नवे जंगल निर्माण होते. ही जंगले आपला जगण्याचा आधार आहेत. हा विचार भवाई पूजेनिमित्त रुजवला जात आहे. कोहाना, सोसोखेडा, कंजोली, धारणमहू, मोथाखेडा, अशा विविध गावात नुकतीच भवाई पूजा संपन्न झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here