टाळेबंदीच्या नवीन नियमानुसार सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, भोजनालय व शिव भोजन हे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि मैदानांवर पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वाकिंग, जॉगिंगसह इतर कवायती करण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे. तसेच खाजगी शिकवणी वर्ग, जिम, वाचनालय, प्रशिक्षण संस्था सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुले ठेवता येणार असून आसन क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थिती अभिप्रेत आहे. लग्न समारंभाकरिता मंगल कार्यालयांमध्ये वधू-वरासहित पन्नास लोकांची उपस्थिती असणार आहे, तसेच हा कार्यक्रमाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनुमती देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
याबरोबरच अंतिमसंस्काराकरिता वीस लोकांना परवानगी देण्यात आली आहे. टॉकीज, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह आसन क्षमतेच्या 25% उपस्थिती ठेवता येणार आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी पूर्णता सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या दहा टक्के कोरोना रुग्ण आहेत, अशा ठिकाणी जाण्या-येण्यासाठी ई-पास घेणे आवश्यक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. कोरोनाला पूर्णपणे हरवण्यासाठी शासनाने दिलेल्या पंचसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन टाळेबंदी शिथिल करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. तसेच मास्कचा उपयोग करून हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझरचा उपयोग नियमित करावा. लसीकरणासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कुटुंब आणि परिसरातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यात प्रोत्साहित करावे. या द्वारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करता येईल, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times