मुंबईः राज्यपाल सचिवालयात विधान परिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्या वतीने माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या अर्जावर देण्यात आली होती. त्यानंतर यावरुन राज्यात वादळ उठलं होतं. राजभवन सचिवालयात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या अपिलावर सुनावणी झाली. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःकडे ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून राज्य मंत्रिमंडळानं १२ आमदारांची नावं यांच्याकडे पाठवली आहेत. मात्र, हा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही महिन्यांपूर्वी माहिती अधिकार अंतर्गत राजभवनाकडे १२ आमदारांच्या यादीसंदर्भात माहिती मागितली असता राजभवनने राज्यपाल सचिवालयात विधान परिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, असं कळवलं होतं. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानं राज्यापालांवर निशाणा साधला होता. मात्र, आता ती यादी राजभवनातच उपलब्ध असून राज्यपालांकडे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता या यादीवर राज्यपाल कधी निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः

राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर सुनावणी घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे यादीसहीत संपूर्ण माहिती आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असं सांगितलं. तसंच, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती दयावी किंवा नाही? याबाबत सल्ला घेतला जाईल, असं जांभेकर यांनी नमूद केलं आहे.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here