शाम कोळी यांच्या एका मित्राचा मंगळवारी वाढदिवस असल्याने कोळी व त्यांच्या आसोद्यातील मित्रांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गावात शुभेच्छा फलक लावले. यानंतर रात्री १२.३० वाजता ते मित्राची दुचाकी घेऊन शेळगाव रस्त्याला गेले होते. पाच मिनीटात येतो एवढाच निरोप त्यांनी कुटुंबीय व मित्रांना दिला होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ते घरीच परतले नाहीत. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता त्यांचा महामार्गावर त्यांचा मृतदेह आढळुन आला. शेळगाव येथील काही नागरीकांनी ओळख पटवल्यानंतर कोळी यांच्या घरी माहिती देण्यात आली. कुटुंबिय, मित्रांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कोळी मृत स्थितीत आढळुन आले. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दुचाकीवर आढळले निलगायीचे केस
मृत कोळी यांची दुचाकी त्यांच्या मृतदेहापासून सुमारे १५० फुट लांब रस्त्याच्या कडेला पडलेली होती. त्यांच्या दुचाकीवर तसेच रस्त्यावर नीलगायीचे केस आढळुन आले. धावत्या दुचाकीस नीलगायीने धडक दिल्यामुळे कोळी दुचाकीवरुन खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. असा खुलासा करण्यात आला आहे.शाम कोळी एकुलते होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित बहिण, वडील शांताराम कोळी, आई कलाबाई, पत्नी सिमा, मुलगा हेमंत (वय ६) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे. कोळी हे घरातील कर्ते पुरूष होते. त्यांच्या दुर्देवी मृत्यूमुळे आसोदा गावात हळहळ व्यक्त होते आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times