वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.’
खासदार संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळायला हवे अशी भूमिका घेतली आहे. या भेटीदरम्यान मला बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत?, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा-
तसेच या भेटीदरम्यान, राज्यातील राजकारण शिळे झाले असून खासदार संभाजीराजे ते दूर करू शकतात, असे सूचक वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
क्लिक करा आणि वाचा-
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर आपल्यापुढे दोन मार्ग शिल्लक असून त्यांपैकी एक म्हणजे रिव्ह्यू पिटिशन करणे आणि दुसरा म्हणजे ते रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्यानंतर क्युरेटीव्ह पिटिशन दाखल करणे हे असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते. यासाठी हातात सत्ता हवी. राज्यातील राजकारणात शिळेपणा आला आहे आणि त्यात ताजेपणा आणण्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यायला पाहिजे असे आंबेडकर म्हणाले होते.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times