पुणे : उजनी धरणातील पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी हे इंदापूरसाठी वळवण्याच्या निर्णयानंतर सोलापूरकरांचा रोष पत्करावा लागलेले राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री (Solapur ) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या पाणीप्रश्नावरून त्यांचं पालकमंत्रिपद जाणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP ) यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केलं आहे. त्यामुळे भरणे यांची या पदावरून उचलबांगली होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

शरद पवारांसोबत हाय व्होल्टेज बैठक
काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भरणे यांना पालकमंत्री पदावरून बदलण्याची मागणी सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडूनच करण्यात येत होती. मात्र, भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, ‘ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पालकमंत्री बदलण्याची मागणी करण्यात आलेली नाही. भरणे हेच पालकमंत्री राहतील.’

‘सोलापूर जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी नियोजन करण्याबाबत पवार यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उजनी धरणातील पाणी वापरातून निर्माण होणारे सांडपाणी हे उचलून शुद्धीकरण करून शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात सोडणारी योजना आखण्यात आली होती. त्याद्वारे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्यास राज्य सरकारने मंजुरीही दिली होती. ही योजना झाल्यास उजनीतील सुमारे पाच टीएमसी पाणी हे इंदापूर तालुक्याला मिळणार होते. मात्र, सांडपाणी दाखवून उजनीतील पाणी हे इंदापूरला देण्यात येणार असल्याचा दावा करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी सोलापूरकरांकडून करण्यात आली होती.

भरणे यांच्याविरोधात सोलापूरमध्ये आंदोलनही झाले होते. हा वाद चिघळणार असल्याचे लक्षात आल्यावर जलसंपदामंत्री पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, भरणे यांना पालकमंत्रिपदावरून हटविण्याची मागणी सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पालकमंत्रीपदी भरणे हेच राहणार असल्याचे जाहीर केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here