मुंबई: राज्यात आज दिवसभरात ९ हजार ३५० नव्या () बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १५ हजार १७६ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात ३८८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 9350 new cases in a day with 15176 patients recovered and 388 deaths today)

आजच्या ३८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे.


गडचिरोलीत सर्वात कमी सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३६१ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १७ हजार ६२३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ५१९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ९४९ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ७३५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ६४० इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये ४ हजार ७०५ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ६३७, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार १८१ इतकी आहे. जळगावमध्ये २ हजार ८०६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ०२३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार २४५ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३२७ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here