या घटनेमुळे ट्रकमधील तेलाच्या बॉक्स चोरी प्रकरणासह पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नागोत्रा हे सोयाबीन तेलाची खोकी घेऊन ९ जून रोजी सावनेरहून ट्रक क्र. एम.एच. ०४-जी.आर.२७७४ मुंबईकडे निघाले होते. रात्री १२.३०च्या सुमारास ते अमरावती मार्गावरील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारगाव येथील पेट्रोल पंपावर थांबले. १० जून रोजी सकाळी सातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ट्रकची ताडपत्री फाडली गेल्याचे त्यांना दिसले. चोरीच्या या घटनेची तक्रार त्यांनी कोंढाळी पोलिस ठाण्यात केली.
कोंढाळीचे ठाणेदार प्रफुल्ल फुल्लरवार यांनी चौकशी केली असता प्रथम दर्शनी अशोक नागोत्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. या ट्रकमधील मालाचे मोजमाप करायचे असल्याने हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारातच उभा होता. मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा यांनी ट्रकच्या केबिनबाहेर गळफास अडकलेल्या स्थितीत लटकताना आढळून आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी हाता पायावर ‘मै चोर नही हूँ’ असं लिहिलेलं आढळून आलं आहे.
चालकाने आत्महत्या केल्याने पोलिसांच्या कारवाईवरही आता प्रश्न चिन्ह लागले आहे. पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला का, की कोणाच्या दबावाखाली कारवाई केली, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
न्यायाधीश, एपीच्या उपस्थितीत पंचनामा
माहिती मिळताच पोलिस अधीक्षक ओला यांनी घटनास्थळ गाठले़. पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून नागोत्रा यांचा पंचानामा काटोल न्यायालयाच्या न्यायाधीश निलिमा पेठे व काटोलचे तहसीलदार अजय चरडे, तलाठी निलेश कदम, तलाठी गिरीश कोहळे व राकेश पिंपळकर, पत्नी व मुलासमोर केला. याप्रकरणाचा पुढील तपास सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर हे करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times