: जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पेरणीची कामे सुरू आहेत. अशातच पेरणी व शेती कामाचा केंद्रबिंदू असलेले गोवंश निर्दयपणे कोंबून नेण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. यातील गोवंशाची सुटका करून तब्बल तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस स्टेशन तळेगाव हद्दीतून अवैधरित्या गोवंश जनावरांची निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक होत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून ग्राम तळेगाव ते निमगव्हाण फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहनांची तपासणी केली असता टाटा एस वाहन क्रमांक एम एच २७ एक्स ८५१७ हे संशयीतरित्या येताना दिसले. त्यास शिताफीने थांबवून तपासणी करण्यात आली.

या वाहनात चार गोवंश जनावरे तोंडमुस्के बांधून कोंबलेले दिसून आले. तसंच सदर वाहन किंमत तीन लाख रुपये व त्यामधील गो वंशीय जनावरे किंमत ८० हजार रुपये असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी १) ऋषभ मारुती काळेकर (वय 26 वर्ष) वाहन चालक राहणार पंझरा तालुका नांदगाव खंडेश्वर २) जनावर मालक सय्यद सादिक सय्यद अयुब (वय ४५ वर्ष) राहणार सालोड तालुका नांदगाव खंडेश्वर यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई आज मंगळवारी १५ जून रोजी करण्यात आली.

दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे का संजय भोपळे, पो का मनीष कांबळे, संदेश चव्हाण, प्रदीप मस्के सर्व पो स्टे तळेगाव दशासर यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here