औरंगाबाद: शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सने दागिने तयार करण्यासाठी कारागिराकडे सोने दिले असता संबंधित कारगिराने दिलेल्या सोन्यापेक्षा तब्बल ४० लाख रुपये किमतीचे ८४५ ग्रॅम कमी सोने देऊन सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( )

वाचा:

उदय हरीदास सोनी (४२, रा. समर्थ नगर ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जालना रोडवरील लालचंद मंगलदास सोनी या ज्वेलर्सच्या दुकानातून ( रा. पानदरिबा ) याला १ जून ते ४ जून या काळात ३.२७९ किलोग्रॅम सोने दागिने तयार करण्यासाठी देण्यात आले होते. अमरचंद सोनी याने दिलेल्या सोन्यापैकी २.४३३ किलोग्रम सोन्याचे दागिने तयार करून दिले. मात्र, तब्बल ८४५ ग्रॅम सोने त्याने परत दिले नाही. त्याची किंमत ४०.१८ लाख इतकी असून ही बाब लक्षात येताच उदय सोनी यांनी तक्रार केली.

वाचा:

उधारी फेडण्यासाठी विकले दागिने

कारागिराला दिलेल्या सोन्यापेक्षा कमी दागिने आल्याबाबत विचारणा करण्यासाठी उदय सोनी हे अमरचंद सोनी याच्याकडे गेले असता, अमरचंद याने लॉकडाऊन काळात माझ्यावर प्रचंड उधारी झाली होती. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे दागिने तयार करण्यासाठी दिलेल्या सोन्यातून तयार केलेले दागिने परस्पर विकल्याची कबुली त्याने दिली. याबाबत उदय सोनी यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमरचंद याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here