मुंबई: मुंबईतील दैनंदिन बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून १ हजाराच्या खाली आली असून गेल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याचवेळी ७१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांचा आकडाही कमी होत असून आज आणखी १४ रुग्ण करोनाने दगावले. ( )

वाचा:

मुंबईतील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभरात मुंबईत ५७५ नवे करोना बाधित आढळले तर ७१८ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. करोनाने गेल्या २४ तासांत आणखी १४ रुग्ण दगावल्याने मृतांची एकूण संख्या आता १५ हजार २१६ इतकी झाली आहे. मुंबईचा सध्या ९५ टक्के आहे. ८ ते १४ जून या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के इतका राहिला असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल ७०२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत दिवसभरात २३ हजार ६८१ चाचण्या करण्यात आल्या. झोपडपट्टी विभाग आणि चाळीत सध्या १९ सक्रिय आहेत तर ८६ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

मुंबईतील २४ तासांतील स्थिती

बाधित रुग्ण – ५७५
बरे झालेले रुग्ण – ७१८
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८४८२५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५ %
एकूण सक्रिय रुग्ण- १५,३९०
दुप्पटीचा दर- ७०२ दिवस
कोविड वाढीचा दर ( ८ जून ते १४ जून)- ०.०९ %

जिल्ह्यात ४३६ नवीन रुग्णांची वाढ

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नवीन ४३६ करोना रुग्णांची वाढ झाली. यापैकी ठाणे शहरामध्ये ८३, कल्याण-डोंबिवली १४४, नवी मुंबई ८७, उल्हासनगर ८, भिवंडी ४, मिरा-भाईंदर ५१, अंबरनाथ १०, बदलापूर ५, ठाणे ग्रामीणमध्ये ४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ५ लाख २५ हजार ९७३ वर गेली आहे. तर दिवसभरात २५ रुग्ण दगावल्याची नोंद झाल्याने जिल्ह्यातील करोनाबळींची संख्याही वाढत १० हजार ३३२ इतकी झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here