पुणे: नवीन बोगद्याजवळील गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेल जवळ सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करत महामार्गाच्या कडेला मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ( )

वाचा:

(वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी सांगितले, की जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या मुलाचा शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. हा खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मुलाचा खून करून या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत.

वाचा:

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील खळद येथे सासवड ते जेजुरी जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस हॉटेल सूर्याच्या विरुद्ध दिशेला ३५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे. त्यानंतर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामहिलेची ओळख पटलेली नाही. या ठिकाणी देखील महिलेचा मृतदेह आणून टाकला आहे. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here