म. टा. प्रतिनिधी मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो ७ मार्गिकेला पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर या उपनगरीय रेल्वे स्थानक जोडण्यासाठी चाचपणीचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिले आहेत.

मेट्रोचे काम सन २०१९मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता २०२१ साल उजाडले आहे. मेट्रो ७च्या स्थानकाचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयुक्त श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. नियोजित कालमर्यादेपेक्षा तब्ब्ल दीड वर्ष मेट्रोला विलंब झाला आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चाचणी सुरू झाली असून, आज, बुधवारपासून मेट्रोमध्ये डायनॅमिक चाचणीला सुरुवात होणार आहे. ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअरचा वापर करून ही चाचणी पार पडणार आहे. ही मेट्रो स्वयंचलित असल्याने याची चाचणी घेणे गरजेचे आहे, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले. गोरेगाव स्थानक ते मेट्रो ७वरील राम मंदिर उपनगरी स्थानकाच्या जोडणीची शक्यता तपासण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही जोडणी शक्य झाल्यास मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होईल. तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीही बऱ्यापैकी कमी होणार आहे.

लिफ्ट, जिन्यांचे काम बाकी

‘मेट्रो स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटवर लिफ्ट, जिन्यांचे काम बाकी आहे. प्रत्यक्ष मेट्रो सुरू होण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळवणे गरजेचे असते. ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेता मुंबईकरांचा मेट्रो २ अ आणि मेट्रो ७मधून नेमका प्रवास केव्हा सुरू होईल, यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. सध्या सर्व स्थितींचा आढावा घेण्यात येत असून, शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत’, असेही आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

2 COMMENTS

  1. What are the effects of these so called therapeutic drugs cheapest cialis available The company is working mainly as a Poultry and Animal Feed Supplements Distributor super stockiest for feed supplement, vitamins, and amino acids, raw materials in poultry and livestock segment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here