म. टा. प्रतिनिधी, मुंबईः शिवसेनेचे आमदार यांनी अंगावर कचरा ओतून अमानुष वागणूक दिलेल्या कंत्राटदाराला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे संसर्ग झाल्याचा दावा कंत्राटदाराने केला असून लांडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कुर्ला कमानी परिसरातील संजयनगर येथे नालेसफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबण्याचा प्रकार घडल्याचा दावा दिलीप लांडे यांनी केला आहे. या कंत्राटदाराला रविवारी १३ जूनला घाणेरड्या पाण्यात बसवून अंगावर कचरा ओतण्यात आला होता. या घटनेचा धसका घेऊन तो आजारी पडला असून त्याला बोरीवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times