मुंबई: ‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असं म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. . लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या तीन वर्षांपासून एकहाती सूत्रे सांभाळणारा हा कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलणारा हा बहुगुणी कलाकार. या कलाकाराचं एक मोठं स्वप्न सत्यात उतरलं आहे. मायानगरी मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं निलेशचं स्वप्न नुकतच पूर्ण झालं.

निलेशचा मित्र आणि अभिनेता यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निलेशनं मुंबईत घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘काही वर्षांपुर्वी पनवेलच्या बस स्टॉपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईल्या स्वत:च्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा .Dr.तुझं अभिनंदन . आणी जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीच खरं कौतुक’, अशा गोड शुभेच्छा कुशलनं निलेशला दिल्या आहेत.

कुशलनं लिहिलेल्या पोस्टवरून निलेशचा हा प्रवास सहज सोपा नव्हतं हे लक्षात येतं. महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या टॅलेंट हंट शोमधून निलेश साबळेची महाराष्ट्राला ओळख झाली. पुढे ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या विविध पर्वांचे निवेदन करत, त्यातील विनोदी प्रहसनांचं लेखन करत स्वतःची एक वेगळी ओळख त्यानं निर्माण केली. ‘फू बाई फू’ नंतर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आला आणि त्यानं मनोरंजनाची व्याख्याच बदलली. मराठी नाटक आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीचं हे हक्काचं व्यासपीठ बनलं.

दर आठवड्याला थुकरटवाडीचे हे कलाकार येतात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा सिलसिला गेल्या तीन वर्षांपासून अखंड सुरु आहे. मुंबईतील स्टुडिओत चित्रीत होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्तानं विविध शहरांमध्ये गेला आणि गावागावांतील प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वीही ठरला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here