पर्लला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर आसाराम बापूदेखील गेली अनेक वर्ष तुरुंगात आहेत. त्यांच्यावरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांनाही पर्लप्रमाणे पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. जर या प्रकरणी पर्लला जामीन मंजूर होऊ शकतो तर बापूंना का नाही, असं बापूंच्या भक्तांचं म्हणणं आहे. त्यांनी हा पक्षपात आहे असं म्हणत न्यायव्यवस्थेवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर बापूंचे भक्त या गोष्टीला विरोध करत आहेत.
एका युझरने ट्वीट करत लिहिलं, ‘आसारामजी बापू पॉक्सो कायद्यामुळे गेली आठ वर्ष तुरुंगवास भोगत आहेत. त्यांना एकदाही जामीन मिळाला नाही. परंतु, अभिनेता पर्ल वी पुरी याला फक्त १२ दिवसात जामीन मंजूर झाला. वाह रे न्यायपालिका!’ तर आणखी एका युझरने ट्वीट करत लिहिलं, ‘हा एक अभिनेता पर्ल वी पुरी याला जामीन मिळतो. जिथे भारताला संतांची भूमी म्हटलं जातं, तिथे त्याच पॉक्सो कायद्यांतर्गत आसाराम बापूंना जामीन मिळत नाहीये. या अर्थाने तर आसारामजी देखील गुन्हेगार नाहीयेत. भारतात न्यायव्यवस्था पैसे देऊन विकत घेता येऊ शकते. हे लाजिरवाणं आहे.’ अशा प्रकारचे अनेक ट्वीट यांचे भक्त करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times