यवतमाळ : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी येथील झामड किराणा दुकानावर एसपीच्या विशेष पथकाने धाड टाकून जवळपास साडे आठ लाख रुपये किंमतीचा मजा नामक सुगंधित तंबाखूसह ईगल सुगंधीत सुपारी, गुटखा व पानमसाला जप्त केला. ही कारवाई १५ जुन रोजी दुपारी एक वाजता दरम्यान करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी तयार केलेल्या विशेष पथकाच्या कारवाईने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या विशेष पथकाकडून कारवाईचा धडाका सुरू असतांना पथक प्रमुख सपोनी मुकुंद कवाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथील झामड यांच्या किराणा दुकानात धाड टाकली.

या कारवाई दरम्यान, दुकानातील गोडावूनमध्ये मजा, ईगल, १२० या सुगंधित तंबाखुसह सुगंधित सुपारी व गुटखा पुडी असा एकूण ८ लाख ५१ हजार ९८० रुपयांचा माल मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रितेश झामड यांना अटक केली असून प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले.

या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक वणी व पांढरकवडा उपविभाग प्रमुख सपोनी मुकुंद एस कवाडे, राजु बागेश्वर यांनी पार पाडली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here