वाचा:
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री यांनी राऊतांवर टीका केली होती. संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला दानवे यांनी हाणला होता. त्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिलं. ‘राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री. पक्षाचे आदेश असतात. सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडं चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळं लावलं आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं,’ असा चिमटाही राऊत यांनी काढला. ‘रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात. ग्रामीण नेतृत्व आहे. त्यांच्या शैलीचं मी नेहमीच कौतुक केलंय,’ अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली.
वाचा:
कोल्हापूर इथं सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. ‘कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यातील सर्वच घटकांचा पाठिंबा व सहानुभूती आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडं घातलं आहे. मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळं या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल,’ असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times