या घटनेनंतर भाजप आमदार आशीष शेलार हे देखील माहिम पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी देखील मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात, त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते’, असे म्हणत यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल , असेही शेलार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी निष्पक्ष काम करावे अशी अपेक्षा आहे असे शेलार म्हणाले. या घटनेनंतर आता पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर असे झाले नाही तर हे आंदोलन आणखी वाढेल, असा इशाराही शेलार यांनी दिला. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही शेलार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे?’
यावेळी भाजप आमदार आशीष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे हे आम्हाला अजूनही कळत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेवर टीका करत असताना ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, अशा खोचक शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times