पाहा नेमकं घडलं तरी काय…राहुल द्रविडने एका खास मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला. चाहते कुठेही भेटतील तर त्यांच्याशी बोलत जा, कोणालाही नाराज करु नको, असे द्रविडला त्याच्या आई-वडिलांनी सांगतिले होते. त्यानंतर हा किस्सा घडला. द्रविडने याबाबत सांगितले की, ” एका मोठ्या दौऱ्यावरून मी आलो होतो. त्यामुळे मी माझी झोप पूर्ण करत होतो. घरी आल्यावर सकाळीच मी झोपलो होतो आणि संध्याकाळी उठलो. त्यावेळी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, एक चाहती तुला थेट हैदराबादहून भेटायला आली आहे. त्यानंतर मी तिला भेटलो. तिचा माझी स्वाक्षरी हवी होती, ती मी दिली. त्यानंतर तिने माझ्याबरोबर फोटोही काढून घेतला. पण त्यानंतर ती चाहती घरातून बाहरे पडायचे नावंच काढत नव्हती. आपण घराबाहेर जाणार नसल्याचे तिने आम्हाला सांगितले. याबाबत विचारणा केल्यावर तिने सांगितले की, ‘ मी घर सोडून आली आहे आणि आता तुझ्याबरोबरच राहणार आहे.’ त्यानंतर माझ्या आई-वडिलांना समजले की, कोणत्याही व्यक्तीला घरामध्ये प्रवेश द्यायचा नसतो.”
द्रविड जेव्हा खेळत होता तेव्हा त्याचा चाहता वर्ग फार मोठा होता, यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे द्रविडला वॅलेंटाइनच्या दिवशी बरीच पत्र आणि संदेश यायचे. त्यामुळे महिला चाहत्यांमध्ये द्रविड हा चांगला प्रसिद्ध होता. पण एका चाहतीने द्रविडला असा मोठा धक्काच दिला होता. प्रत्येक सेलिब्रेटीला असे धक्कादायक अनुभव येत असतात. काही वेळा सुखद अनुभवही येतात. त्यामुळे आपण कोणाबरोबर कसं राहायचं आणि कोणाबरोबर किती बोलायचं, हे त्यांना नेहमीच ठरवावं लागतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times