मुंबई: क्षेत्रात संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असून दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारीही हजाराच्या खालीच राहिली. २४ तासांत ८३० नवीन करोना बाधितांची नोंद झाली तर त्याचवेळी १३०० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. करोनाने बुधवारी आणखी ११ रुग्ण दगावले असून आतापर्यंत मुंबईत या संसर्गाने १५ हजार २२७ रुग्णांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील करोना स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे महापालिकेच्या वतीने बुधवारी हायकोर्टात सांगण्यात आले. ( )

वाचा:

मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके आहे तर कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७२७ दिवसांवर गेला आहे. बुधवारी एकूण २९ हजार ५८८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या २० सक्रिय आहेत तर पाचपेक्षा अधिक बाधित असलेल्या ८० इमारती सील करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांतील स्थिती

बाधित रुग्ण – ८३०
बरे झालेले रुग्ण – १३००
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८६१२४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४९०७
दुपटीचा कालावधी- ७२७ दिवस
कोविड वाढीचा दर ( ९ जून ते १५ जून)- ०.०९ %

हायकोर्टात दिली महत्त्वाची माहिती

मुंबई महापालिकेने हायकोर्टात बुधवारी करोना बाबत महत्त्वाची माहिती दिली. मंगळवारच्या आकडेवारीचा तपशील हायकोर्टात देण्यात आला. मुंबईत मंगळवारी करोनाचे फक्त ५७५ नवीन रुग्ण आढळले. परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असून रुग्णालयांतील खाटांचे नियोजनही पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात दिली.

वाचा:

इंजेक्शनचा तुटवडा

राज्यभरात १५ जूनपर्यंत म्युकरमायकोसिसचे एकूण सात हजार ५११ रुग्ण आढळले. सध्या चार हजार ३८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील आठवडाभरात ७५ मृत्यू झाले, अशी माहिती कुंभकोणी यांनी हायकोर्टात दिली. म्युकरमायकोसिसवरील एकमेव औषध असलेल्या अॅम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा एकूण पुरवठा आजच्या घडीला पाच हजार ६०० कुप्या इतका आहे. परंतु प्रत्येक अॅक्टिव्ह रुग्णाला दर दिवशी चार डोस लागतात. त्यामुळे चार हजार ३८० रुग्णांना एकूण १७ हजार ५२० कुप्या आवश्यक आहेत. सध्याचा पुरवठा अपुरा आहे, असेही कुंभकोणी यांनी नमूद केले. हाफकिन बायोफार्माकडून १८ ते २० जून या कालावधीत राज्य सरकारला अॅम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा पुरवठा २२ हजार कुप्यांच्या प्रमाणात होणार आहे आणि २१ जून ते ३० जून या कालावधीत उर्वरित १८ हजार इंजेक्शनच्या कुप्या उपलब्ध होतील, अशी दिलासादायक माहितीही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here