नागपूर: नव्याने संसर्ग होणाऱ्यांची संख्या अर्धशतकाच्या खाली घसरलेल्या जिल्ह्याची चिंता बुधवारी पुन्हा वाढली. नव्याने बाधित झाल्याच्या शक्यतेतून तपासलेल्या १० हजार ४०६ नमुन्यांमधून ८६ जणांच्या घशातील स्त्रावात संसर्गाचा अंश आढळला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुटकेचा नि:श्वास टाकत असलेला जिल्हा पुन्हा सावध झाला आहे. ( )

वाचा:

नव्याने संसर्गाचे निदान झालेल्यांमध्ये शहरातील ४९ तर ग्रामीण भागातील ३५ आणि जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. करोना संक्रमण पुन्हा वाढते की काय अशी धास्ती नागपुरकरांना बसलेली असताना आज दिवसभरात २७९ बाधित लक्षणांचा विळखा भेदून ठणठणीत बरे झाले. मात्र नागपूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ३ जणांची झुंज अपयशी ठरली. मृतांमध्ये शहरातील एक जण वगळला तर अन्य दोघेही जिल्ह्याच्या बाहेरून नागपुरात उपचाराला आलेले होते. ग्रामीण भागातून आजही शून्य मृत्यूची नोंद घेतली गेली. कोविडने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ५७७ जणांना करोना विषाणू संक्रमण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यातील ९८ टक्के म्हणजे ४ लाख ६६ हजार २२८ बाधित उपचाराने बरे झाले.

वाचा:

बुधवारची स्थिती

बाधित- ८६
एकूण चाचण्या- १०४०६
अॅक्टिव्ह रुग्ण- १३३६
मृत्यू- ३
एकूण मृत्यू – ९०१३

ब्लॅक फंगस मृत्यूला लगाम

कोविड विषाणूच्या साखळीतून जिल्ह्याची सुटका होत असताना ब्लॅक फंगस संक्रमणाची साखळीही भेदली जात आहे. बुधवारी विभागातून नव्याने २२ जणांना या आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे दिवसभरातून एकाचाही ब्लॅक फंगसच्या संक्रमणाने मृत्यू ओढवल्याची नोंद झाली नाही. त्यामुळे करोना पश्चात ब्लॅक फंगस या काळ्या बुरशीच्या संक्रमणातील वाढ कायम असली तरी उपचार घेऊन या आजारावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शरिरात पसरलेली ही बुरशी उपचाराने बरी होत असल्याने दगावणाऱ्यांचे प्रमाण आटोक्यात येत आहे.

कोविड उपचारादरम्यान मधुमेहिंना स्टिरॉइडची मात्रा सहन झाली नाही व शर्करेचे प्रमाण वाढून ब्लॅक फंगसचे संक्रमण झाले. आतापर्यंत अशा रुग्णांची संख्या विभागात १७१३ पर्यंत नोंदविली गेली आहे. त्यातील १४३९ रुग्ण फक्त नागपूर जिल्ह्यातील आहेत. या काळ्या बुरशीचे संक्रमण झाल्यानंतर विभागात आतापर्यंत १४१ जणांनी प्राण गमावले. त्यातील १३१ नागपूर, गोंदियातील ४ तर आणि वर्धेतील प्रत्येकी ३ जणांचा समावेश होता. ही शरिरातील विविध भागांत पसरल्याने मृत्यूच्या दारात लोटले गेलेल्या ११८९ रुग्णांवर शल्यक्रिया पूर्ण झाल्या. तर ९६६ जणांनी या बुरशीवर मात केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here