मुंबईः अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. या वेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसैनिकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘सेना भवनसमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा तुमचे उद्धव ठाकरे आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आले आहेत. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात,’ अशी जोरदार टीका राणेंनी केली आहे. तसंच, भाजप युवा मोर्चाला टॅग करत मानलं असंही म्हटलं आहे.

वाचाः

नेमकं काय घडलं?

राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भाजयुमो’चा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्यासाठी सेना भवनसमोर जमले. वेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

वाचाः

गुन्हा दाखल

शिवसेना भवनसमोर शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करोनाकाळात मोर्चे, आंदोलनाला बंदी असताना गर्दी जमविल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरा गुन्हा सात जणांवर दाखल करण्यात आला असून यामध्ये मारहाण तसेच महिलेचा विनयमभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here