मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सकाळी शर्मा यांच्या घरी छापेमारी केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ गाडीतील स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्याप्रकरणी प्रदीप शर्मा यांचं नाव आलं होतं. याआधीही एनआयएनं शर्मा यांना समन्स पाठवले होते. तेव्हा प्रदीम शर्मा यांची कसून चौकशी करण्यात आली होती. शर्मा आणि सचिन वाझे हे एकमेकांच्या संपर्कात असून या कटाविषयी शर्मा यांना माहिती असावी, असा संशय तपाय यंत्रणेला आहे.

आज सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमनं धाड टाकली असून अद्यापही त्यांची चौकशी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयएनं शर्मा यांच्या दोन निकटवर्तीयांना ॲंटिलिया स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाचाः

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझेयांच्यासंपर्कात प्रदीप शर्मा होते, असं एनआयएतील सूत्रांकडून समजतेय.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here