म. टा. प्रतिनिधी, जळगाव: भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळातील घोटाळ्याप्रकरणी पुण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आज गुरुवारी पहाटेपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत राज्यभरातील १२ संशयितांना अटक केली आहे. ( )

या संशयितांमध्ये राजकीय नेत्यांच्या जवळचे तर काही मोठ्या व्यापाऱ्यांच्या समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. बीएचआर प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत सकाळपासून आतापर्यंत १२ संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे याठिकाणी हे छापे पडले आहेत. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ टीमकडून एकाच वेळी ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ही माहिती दिली आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला).

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here