अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. या वेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचाः
‘शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्ये नाही. एक टोळका आला होता. आता तो कशासाठी आला होता आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. सामनाच्या अग्रलेखात काय लिहलंय आहे ते आधी वाचा. जे आरोप झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. त्याच्यावर एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भाजपवर कोणीही थेट आरोप केले नाहीत. भाजपने घोटाळा केल्याचं कोणीही म्हटलेलं नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये,’ असा इशाराही यावेळी राऊतांनी दिला आहे.
… तर महाराष्ट्रात चमत्कार होईल
‘भाजप, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना- राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल,’ असं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times