नांदेडः मुलगी- वडील यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. ९ वर्षाच्या पोटच्या केल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली आहे. ()

बालाजी वारकरे असं या आरोपीचं नाव असून नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे हे कुटुंब राहते. आरोपीला चार मुली आहेत. त्यातील एका मुलीचं लग्न झालं असून ती माहेरी असते. घटना घडली त्या रात्री पत्नी आणि दोन मुली बाहेर घराबाहेरच्या अंगणात झोपल्या होत्या. तर, आरोपी ९ वर्षांच्या मुलीसोबत घरात झोपला होता. रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या ९ वर्षाच्या पोटच्या मुलीवर नराधम वडिलांनी अत्याचार केला.

वाचाः

रात्री घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं घरात येऊन मुलीची चौकशी केली. त्यावेळेस मुलीने आईला घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.पोटच्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमिनच सरकरली. मुलीची अवस्था पाहून पीडितेच्या आईनं लगेच पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.

वाचाः

पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी वारकरेविरोधात बलात्कार आणि पोस्को कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. तसंच, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here