बंडू येवले

लोणावळ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (वय-७३) यांच्या प्रधान पार्कमधील बंगल्यावर १० ते १२ जणांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून, गळ्याला धारदार शस्त्र लावून सुमारे ६७ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यात ५० लाखांची रोकड व १७ लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ()

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान १० ते १२ दरोडेखोरांनी खंडेलवाल यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या स्लाइडिंग खिडकीची काच उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर ६ ते ७ जणांनी डॉ. खंडेलवाल यांचे व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून त्यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावले. डॉक्टरांनी जिवाच्या भीतीने कपाट व लॉकरची चावी दरोडेखोरांना दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी सर्व कपाटे व लॉकर उघडून त्यामधील सुमारे ५० लाखांची रोकड व १७ लाखांचे दागिने असा अंदाजे ६७ लाखांचा ऐवज घेतला. नंतर बेडरूममधील चादर पहिल्या मजल्यावरील लोखंडी रेलिंगला बांधून भरलेल्या बॅगा घेऊन खाली उतरून पोबारा केला. या घटनेचं दृश्य बंगल्यातील एका सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

वाचा:

दरोडेखोर निघून गेल्यानंतर डॉक्टरांनी अलार्मचे बटन दाबून दवाखान्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिली. अलार्मचा आवाज ऐकून कर्मचारी तुषार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांच्या रूममध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांना डॉक्टर व त्यांच्या पत्नी हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. तसेच घरात सर्व वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसल्या. शिंदे व इतरांनी लगेचच खंडेलवाल यांची सुटका केली आणि तत्काळ लोणावळा पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नवनीत रावत व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी‍ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही देण्यात आली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. लोणावळा शहर पोलीस देखील या घटनेचा तपास करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here