वाचा:
दोन दिवसांपासून मोढवे बेपत्ता होते. सकाळी सातच्या सुमारास पेपर आणण्यासाठी जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर घरी आलेच नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आणि शोध सुरू केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळा धरणात वावरथ-जांभळी शिवारात पाण्यात कडेला एक मृतदेह तंरगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह यांचाच असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, वावरथचे सरपंच रामदास बाचकर, बारागाव नांदूरचे सरपंच निवृत्ती देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.
वाचा:
मोढवे यांच्या मृतदेहाजवळ किंवा घरी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात यासंबंधी अद्याप पोलिसांनी काहीही निष्कर्ष काढलेला नाही. मोढवे विमा व आरटीओ प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आल्यापासून ते अस्वस्थ होते, असे काहींचे म्हणणे आहे. ऑनलाइन पद्धतीने काम चालणार असल्याने परिवहन कार्यालये बंद होणार, अशी ती बातमी होती. तेव्हापासून मोढवे अस्वस्थ होते. आधीच लॉकडाउनचा फटका बसलेला असताना आरटीओ बंद झाल्यावर आपले कसे होणार, या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा तर्क लावला जात आहे. पोलिसांकडून मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. सर्व बाजू लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times