अकोला : अकोला ते अकोट रोडचे तीन ते चार वर्षांपासून काम सुरू आहे. आतापर्यंत या रोडवर अनेक अपघात झाले आहेत. आताही असाच एक भीषण अपघात या रोडवर घडला आहे. वारंवार अशा अपघाताच्या घटना समोर आल्यानंतरही रोडचे काम पूर्ण होत नाही. इतकंच नाही तर तात्काळ का होईना प्रवाशांना प्रवास करण्यासाठी योग्य रस्ता तयार करण्यात येत नाही. प्रशासनाच्या या चुकीमुळे आजही एका युवकाला जीव गमावण्याची वेळ आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक अकोलाकडून अकोटकडे जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज बळेगाव फाट्यानजीक घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून युवकाची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्याचं काम कधी होणार आणि हे जीवघेणे अपघात कधी थांबणार असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here