शेतकर्यांच्या वर्षभराचे गणित खरीप हंगामावर अवलंबून असते. मागील काही वर्षांपासून शेतकरी सतत नापिकीचा सामना करीत आहे. तरीदेखील एक हंगाम आपल्याला साथ देईल, या अपेक्षेने बळीराजा शेतात राबत आहे. गेल्या वर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.
बोगस बियाण्याचा फटका शेतकर्यांना देशोधडीला लावणारा ठरला. या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला. काही ठिकाणी बोगस बियाणे, खतांच्या साठेबाजीवर धाडसत्र राबविण्यात आले. मात्र, बोगस बियाणे विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यात कृषी विभागाला यश आले नाही. पेरणीच्या तोंडावर शेतकर्यांच्या माथी बोगस सोयाबीन बियाणे आणि तेही चढ्या भावात देण्यात येत आहे. अशीच परस्थिती राहिल्यास शेतकर्यांनी कुणाकडून अपेक्षा धरायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times