वाचा:
केरा नदीचे पाणी मुख्य नदीपात्रापासून सरासरी पंधरा ते वीस फुटांच्या उंचीपर्यंत पोहचल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक ठिकाणी नदीकाठावरील शेतपिकं वाहून गेली. काही शेतकऱ्यांचे शेतीपंपही वाहून गेले. केरळ, मणदुरे, निवकणे, दिवशी, जुंगटी, चापोली, आरल, खिवशी, घाणव, आंबवणे, चिटेघर, तामकणे, बोंद्री, कातवडी, मेष्टेवाडी, सुरुल, बिबी, मेंढोशी, साखरी आदी गावांतील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
वाचा:
रात्री १०.३० नंतर पावसाचा जोर वाढला आणि…
बुधवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. रात्री आठ वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. रात्री १०.३० नंतर पावसाचा जोर वाढत गेला. गुरुवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. या सहा तासांच्या कालावधीत केरा नदीच्या खोऱ्यातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. मार्ग मिळेल तिकडे पुराचे पाणी जात होते. शेताचे बांध फुटले, पिके वाहून गेली, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. केरा नदीने रौद्र रूप धारण केल्याने नदीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांतील नागरिक भयभीत झाले होते. संपूर्ण रात्री भीतीच्या छायेत गेली. केरा नदीला असा पूर आल्याचे आम्ही याआधी कधीही पाहिले नही, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्या
पाटण तालुक्यात ढगफुटीसदृष्य पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरभागातील गावांमधील अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत, अनेक ओढ्यांवरील फरशी पूल वाहून गेल्याने, रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पाटण शहरासह अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times