मुंबई : आठवडाभर स्थिर राहिल्यानंतर पेट्रोल दरात आज पुन्हा घसरण झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात मंगळवारी किरकोळ कपात केली. पेट्रोलचा भाव ४ ते ५ पैशांनी कमी झाला असून तो प्रति लीटर ७७.५६ रुपये झाला आहे. डिझेलमध्ये ५ पैशांची कपात झाली असून डिझेल दर ६७.७५ रूपये आहे.

पेट्रोलियम कंपन्यांच्या मागील १८ दिवसात दर कपातीने पेट्रोल १ रुपया ३० पैसे आणि डिझेल १ रुपया ५७ पैशांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील घसरणीने पेट्रोलियम कंपन्या मागील काही दिवसांपासून इंधन दर कमी करत आहेत. खनिज तेलाचा भाव आणि डॉलर रुपया चलन विनिमय दर यावरून तेल कंपन्या दररोज इंधन दर ठरवत असतात. देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुसंगत केले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आठवडाभर पेट्रोल दर स्थिर ठेवले होते तर डिझेल दरात कपात केली होती.

आजच्या दर कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ७१.८९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ग्राहकांना ६४.६५ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत स्थानिक कर कमी असल्याने इतर शहरांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी आहेत. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लीटर ७४.५३ रुपये असून डिझेल प्रति लीटर ६६.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ७४.६८ रुपये झाला आहे. डिझेलचा दर ६८.३२ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव ५७.३० डाॅलरपर्यंत खाली आला. यात ३७ सेंट्सची घसरण झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here