राज्याचे महिला व बालविकास मंत्रालय, राज्य शासन आणि राजमाता जिजाऊ मिशन यांनी संयुक्तपणे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना तीन दिवसांचे सोशल मीडिया प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण झूम कॉलद्वारे देण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान व्हॉटसअॅप आणि या डिजीटल माध्यमांशी ओळख करुन देण्यात आली. दोन्ही माध्यमांचा दैनंदिन व्यवहारात वापर कसा कारावा हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. करोना काळात आंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना गृहभेट देता येत नाही. त्यामुळे स्तनदामाता व गरोदरमाता यांना त्यांची वेळोवेळी मदत मिळावी म्हणून वॉटसप खाते तयार करण्यापासून ते माहिती शेअर करणे, वॉटसअॅप ग्रुप , ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करणे, सदस्यांना ॲड करणे, व्हॉइस कॉल, वीडियो कॉल द्वारे संवाद साधणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना स्तनदा माता व गरोदर स्त्रिया यांच्यासोबत संवाद साधता येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ग्रामीण भागात तरुणांमध्ये फेसबुकचा वापर वाढला असताना आंगणवाडी सेविकांनीही फेसबुकसारख्या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि अनेकांसोबत या माध्यमाद्वारे कन्नेक्ट व्हावे यासाठी फेसबुकचे खाते तयार करणे, माहिती मिळवणे, पोस्ट लाईक, कमेंट, शेअर करणे, नातेवाईकांसोबत, पर्यवेक्षिकांसोबत, स्तनदामाता, गरोदरमाता यांच्यासोबत जोडण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, स्वीकारणे, अधिकृत पेज लाईक करणे, अनेकांनी पोस्ट कालेल्या मीहिती शेअर कारणे, आपली स्वताःची पोस्ट तयार करणे, मत व्यक्त करणे, राबवलेले उपक्रमांचे छायाचित्र पोस्ट करणे या फीचर्स बरोबरच फेसबुकचे फायदे, तोटे या सगळ्या बाबींचा कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणादर्म्याण समावेश करण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा-
तीन दिवस चाललेल्या या सोशल मिडीया ट्रेनिंगची कार्यशाळा झुम कॉलद्वारे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इंद्रा मालो, आय.ए.एस अधिकारी, आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा) यांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सीडीपीओ, डीपीओ,पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे सर्व उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times