पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. काही कामानिमित्त ते आज वाईला आले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ त्यांची मोटार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. मात्र ती काही फूट अंतरावर असणाऱ्या झाडात अडकल्यामुळे एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले.
क्लिक करा आणि वाचा-
मोटार क्रमांक (एमएच १२ ओ टी ६६७२) मोटार दुपारी वाईहून पाचगणीकडे निघाली होती. पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धोक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने मोटार रस्त्यावरील संरक्षक कड्यावर चढून दरीत घुसली. काही फूट अंतर जाताच झाडाला अडकल्याने गाडीतील सर्वांचे प्राण वाचले.
क्लिक करा आणि वाचा-
मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मोटार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times