दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी मागणीच्या प्रकरणात ईडीनेही बुधवारी तीन ठिकाणी छापे टाकले. तसंच तालिबान समर्थक अफगाणी युवक नूर मोहम्मद याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही सर्व पार्श्वभूमी बघता एनआयएचे पथक नागपुरात पोहोचल्याचं वृत्त वाऱ्यासारखं नागपुरात पसरलं आहे.
गुरुवारी रात्री एनआयएचे पथक नागपुरात धडकल्याच्या वृत्ताने उपराजधानीत चांगलीच खळबळ उडाली आहे. परंतु या वृत्ताला स्थानिक यंत्रणेशी संबंधित कोणत्याही यंत्रणेही दुजोरा दिला नाही.
प्रदीप शर्मा अटकेत
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत आहे. या तपासादरम्यान आधी मुंबई पोलिस दलातील माजी एपीआय सचिन वाझे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी दुपारी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे.
व मनसुख हिरन हत्याप्रकरणात एनआयएनं गुरुवारी पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात येत होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अखेर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times