वाचा:
मुंबईत करोनाने आणखी २० रुग्ण दगावले असून त्यातील १३ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. १० पुरुष तर १० महिला रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाला. त्यात ४० वर्षांखालील ४, ४० ते ६० वयोगटातील ७ आणि ६० वर्षांवरील ९ रुग्णांचा समावेश होता. मुंबईत गुरुवारी ६६६ नवीन करोना बाधितांची भर पडली तर ७४१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ८०७ इतकी खाली आली आहे. मुंबईत गुरुवारी २९ हजार ३०९ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५ टक्के इतके असून रुग्ण वाढीचा दर ०.०९ टक्के इतका नोंदवला गेला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७३४ दिवसांवर गेला आहे. झोपडपट्टी व चाळींत सध्या १८ सक्रिय आहेत तर पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८१ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
वाचा:
दरम्यान, करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागात स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. आधी सलग दोन दिवस निरंक आणि गेले दोन दिवस एकेक रुग्ण धारावीत आढळला आहे. सध्या केवळ ६ अॅक्टिव्ह रुग्ण धारावीत आहेत.
मुंबईतील करोनाची ताजी स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ६६६
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ७४१
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८६८६६
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९५ %
एकूण सक्रिय रुग्ण- १४८०७
रुग्ण दुपटीचा कालावधी- ७३४ दिवस
कोविड वाढीचा दर ( १० जून ते १६ जून)- ०.०९ %
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times