नवी दिल्ली : फायनल सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने हार मानल्याचे पाहायला मिळाले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एक विधान केले आहे. त्यामध्ये फायनलपूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने हार मानल्याचे पाहायला मिळत आहे.

फायनलपूर्वी विल्यम्सन म्हणाला की, ” भारत हा एक सर्वोत्तम संघ आहे. भारताचा संघ फारच मजबूत आहे. आतापर्यंत त्यांनी सातत्याने विजय मिळवले आहेत, त्यामुळेच ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. दमदार कामगिरीमुळेच ते अंतिम फेरीत पोहोचण्याच्या लायक आहे. त्यामुळे हा सामान चांगलाच रंगेल, अशी मला आशा आहे. या अजिंक्यपदाचा प्रबळ दावेदार नेमका कोण आहे, हे खेळच सांगेल.”

विल्यम्सनने पुढे सांगितले की, ” न्यूझीलंडच्या संघानेही चांगली प्रगती केली आहे. न्यूझीलंडच्या संघापुढे बरीच आव्हानं होती आणि ती आव्हान पार करत आम्ही आता फायनलपर्यंत पोहोचलो आहोत. माझ्यामते ही प्रत्येक खेळाडूसाठी एक चांगली संधी आहे. कारण सध्याच्या घडीला आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि हाच फॉर्म आम्हाला फायनलमध्येही कायम ठेवायचा आहे. माझ्यामते या गोष्टीवर खेळाडूंनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कसे सकारात्मक बदल आपण करू शकतो, हेच सध्याच्या घडीला आमच्यासाठी महत्वाचे आहे.”

सामन्यापूर्वी विराट कोहली नेमकं काय म्हणाला, पाहा…भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की, ” भारतीय संघ हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातही आम्ही आक्रमक खेळ करणार आहोत. दोन्ही संघ चांगलेच समतोल आहेत आणि चांगला सामना होईल अशी आशा आहे. पण आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही आक्रमकच असणार आहोत. बऱ्याच जणांना वाटत असेल की, आमच्यावर भरपूर दडपण असेल. कारण हा फायनलचा सामना आहे. पण ही गोष्टी खरी नाही. कोणताही सामना करो या मरो यासारखा नसतो. आमच्यासाठी हा एक कसोटी सामना आहे, जो जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत.आम्ही जर या सामन्यात पराभूत झालो किंवा विजयी ठरलो तर क्रिकेट थांबणारे नाही. हा सामना सर्वोत्तम संघ कोणता आहे, यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही गेल्या ४-५ वर्षांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याचबरोबर बरेच विजय मिळवले आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

105 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here