तेल अवीव/ गाझा : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मे महिन्यात लागू झालेल्या शस्त्रसंधीनंतर दोन्ही बाजूने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली जात आहे. इस्रायलने गुरुवारी पुन्हा एकदा गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले.

हमासकडून सुरू असलेल्या कंडोम बॉम्बच्या हल्ल्यांना इस्रायलकडून एअर स्ट्राइकद्वारे प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पॅलेस्टाइनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा शहरातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात एका प्रशासकीय इमारतीचे नुकसान झाले. त्याशिवाय काही शेतींचे नुकसानही झाले. हमासने ही इस्रायलच्या हवाई हल्ल्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्रायलमध्ये स्थापन झालेल्या नव्या सरकारकडून शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचे हमासने म्हटले.

वाचा:

इस्रायलचे ड्रोन पाडले

हमासच्या नियंत्रणात असलेल्या अक्सा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हमासने गाझा शहरात इस्रायलचे एक ड्रोन विमान पाडले. हमासने मशीनगनमधून इस्रायलच्या बाजूने गोळीबार केला. त्यामुळे इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले.

वाचा:

हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हमासकडून कंडोम बॉम्बने हल्ले करण्यात येत आहेत. त्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या लष्कराने कारवाई केली. हमासच्या ठिकाणांवर हल्ले करणार असल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

इस्रायलमध्ये नवीन सरकार आल्यानंतर गाझापट्टीवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. त्याआधी मंगळवारी इस्रायलमधील उजव्या विचारांशी संबंधित राष्ट्रवाद्यांनी शक्ति प्रदर्शन करत पूर्व जेरूसलेममध्ये रॅली काढली. या रॅलीमुळे पॅलेस्टाइन आणि इस्रायलमध्ये पु्न्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या संघर्षात हमासने इस्रायलवर जवळपास तीन हजारांहून अधिक रॉकेट डागले. तर, दुसरीकडे इस्रायलने गाझापट्टीवर जोरदार बॉम्ब हल्ले केले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनचे २०० हून अधिक नागरीक ठार झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश होता. तर, हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या दहा नागरिकांचा मृ्त्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय दबाब आणि इजिप्तने केलेल्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमासने शस्त्रसंधी जाहीर केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here