अहमदनगर: राज्याला करोनामुक्त गाव योजना देणाऱ्या, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गौरविलेल्या हिवरे बाजारवर पुन्हा करोनाचा शिक्का पडला आहे. अर्थात एका जुन्या मृत्यूची राहून गेलेली नोंद आता घेण्यात आल्याने गावात पुन्हा करोनाचा रुग्ण सापडल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. मधल्या काळात प्रशासनाने करोना मृत्यूंच्या आकड्यांची जी लपवाछपवी केली होती, त्याचे दुष्परिणाम आता करोनामुक्त गावांवर पुन्हा करोनाचा शिक्का पडण्यात होत आहेत. शहराच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे.

करोनामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुळत नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोर्टलवर जाहीर होणारे आकडे, आरोग्य विभागाला कळविण्यात येणार आकडे यांचा मेळ बसत नव्हता. यासंबंधी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. त्यानुसार राहून गेलेल्या नोंदी करण्याचे काम दहा जूनपासून सुरू झाले आहे. त्यामुळे जुन्या नोंदी आता केल्या जात असल्याने मृत्यूसह बाधितांचे आकडे वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे. प्रत्यक्षात करोनाची दुसरी लाट ओसरत असून सर्व ठिकाणी दिलासादायक परिस्थिती आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या कमालीची घटली आहे तर अनेक गावे करोनामुक्त झाली आहेत. आता जुन्या नोंदी घेतल्याने या गावांत करोनाबाधित रुग्ण असल्याच्या नोंदी दिसू लागल्याने गोंधळ उडाला आहे.

वाचा:

आदर्शगाव हिवरेबाजारने पुढाकार घेत करोनामुक्त गाव संकल्पना राबविली. त्यामुसार १५ मे रोजी गाव करोनामुक्त झाल्याची घोषणा केली. गुरुवारी (१७ जून) या गावात पुन्हा करोनाचा रुग्ण दाखविण्यात आला आहे. प्रशासनाने खुलासा केला की, हा नवा रुग्ण नाही, तर जुनी मृत्यूची एक नोंद राहून गेली होती, ती आता घेतल्याने गावाच्या पुढे हा आकडा दिसतो आहे. हिवरे बाजारच्या पुढाकारातूनच राज्यात करोनामुक्त गाव स्पर्धा सुरू झाली आहे. आदर्श गाव संकल्पना व कार्य समितीचे कार्याध्यक्ष यांचा यासाठी पुढाकार आहे. करोनामुक्त झाल्यानंतर त्यांचा उल्लेख पंतप्रधानांच्या सोबत झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतूक केले होते. राज्यातील अन्य गावांना मार्गदर्शन करण्यासाठी पवार यांची मदत घेतली जात आहे. असे असताना आता करोनामुक्त हिवरे बाजारमध्ये कागदोपत्री का होईना पुन्हा करोनाबाधित रुग्ण दिसत आहे. राज्यातील अन्य गावांतही अशा नोंदी घेतल्या गेल्याने करोनामुक्त गाव स्पर्धेच्या गुणांकनाच्यावेळी त्याची अडचण ठरू शकते. यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

वाचा:

अहमदनगर शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी नगरमध्ये १४९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन अंकी रुग्ण संख्या असलेल्या शहरात अचानक ही वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. त्यानंतर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ‘नगर शहरात गुरूवारी नवे केवळ ४ रुग्ण आढळून आले आहेत. उरलेले १४५ रुग्ण हे आधीच्या काळात मृत्यू झालेले आहेत. त्यांची नोंद पोर्टलवर घेण्यात आल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी मात्र घ्यावी.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here