वाचा:
राम मंदिराच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपनं शिवसेना भवनवर ‘फटकार’ मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाच्या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. तेव्हा झटापट झाली. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. तर, भाजपच्या काही नेत्यांनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला होता. संजय राऊत यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. शिवसेना भवनवर कोणी चालून आले तर मराठी माणूस गप्प बसेल काय? शिवसेना ही सर्टिफाइड गुंडा पार्टी आहे. मराठी माणसाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू, असं ते म्हणाले होते.
वाचा:
राऊत यांच्या या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली. सुरुवातीला त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. अशा प्रतिक्रिया घेण्यापेक्षा सरकारच्या कामाविषयी बातम्या देण्याची विनंती त्यांनी पत्रकारांना केली. त्यानंतर मात्र त्यांनी आपलं मत मांडलं. ‘कधी-कधी कोणीतरी काही बोलत असतं. कुठलाही पक्ष स्वत:ला गुंड म्हणवून घेणार नाही. आज शिवसेनेचे नेते स्वत: राज्याचे प्रमुख आहेत. कायद्यानं आणि नियमानं राज्य चालवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री स्वत: तसं काम करत आहेत,’ असं ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times