अकोला : अकोल्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पोलिसांनी छापेमारी करून संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मलकापुर शहरातील साई अर्पाटमेटमध्ये हां कुंटणखाना सुरू होता. याची माहिती अकोला पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटिल यांना मिळाली. त्यानंतर मोठ्या हुशारीने सापळा रचून पोलिसांनी मोठी कारवाई केली.

या कारवाई दरम्यान, एका पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अकोल्यातील 29 वर्षीय महिला पैशाचे अमिष दाखवून माहिलांसह तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलीस तपासांत समोर आले.

ही महिला ग्राहकांना आवश्यकतेनुसार पैशाच्या मोबदल्यात तुरुणींचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले आहे. रात्री पकडण्यात आलेल्या तरुणींमध्ये अकोला जिल्ह्यासह मुंबई येथील तरुणींचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी तपास अधिक वाढवला असून यामध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याची चौकशी पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here