बीजिंग: चीनमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याची परिस्थिती आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये करोनाच्या बळींचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये करोनाचे १८०० हून अधिक बळी गेले आहेत. जगभरातही करोनामुळे दहशत निर्माण झाली असून जवळपास २८ देशांमध्ये करोनाचा रुग्ण आढळले आहेत.

चीनमधील हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या व्हायरसची लागण सुरू झाली. करोनामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, हुबेईतील रुग्णालयात दाखल झालेल्या ४१ हजार ९५७ रुग्णांपैकी ९ हजार ११७ जणांची प्रकृती गंभीर असून १८५३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनमध्ये आतापर्यंत १२ हजार ५५२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत ६० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, मकाऊमध्ये १० आणि तैवानमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

वाचा:
दरम्यान, ‘करोना’च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या संसदेचे पाच मार्च रोजी होणारे वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीची या संदर्भात चर्चा सुरू आहे. सत्तेवरील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ने राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यासाठी दोन अधिवेशने व्हावीत असे सूचविले आहे. मात्र, जर आगामी अधिवेशन पुढे ढकलले, तर ती दुर्मिळ घटना समजली जाईल.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here