‘अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली जी गाडी उभी होती, त्या प्रकरणी सचिन वाझे यास अटक झाली. आता यांनाही अटक झाली आहे. पण या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड वेगळाच आहे. त्याचा शोध घ्या अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. त्याला इतके दिवस का लागतात? ही काय पंचवार्षिक योजना आहे का?,’ असा सवाल त्यांनी केला.
वाचा:
या प्रकरणातील खरा सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, याचे मास्टरमाइंड परमबीर सिंग हेच आहेत. त्यांना वाचवण्यासाठीच भाजपची धडपड सुरू आहे. भाजपनेच माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिण्यास परमबीर सिंग यांना भाग पाडले, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
राम जन्मभूमीसाठी जी जागा घेतली, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करून खरे काय ते जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘शिवसेना भवनावर मोर्चा काढून किंवा कुणाच्यातरी नामफलकावर काळे फासून हा प्रश्न सुटणार नाही. लोकांनी जर संशय व्यक्त केला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. केंद्र सरकारने लवकरात लवकर या बाबतीतले सत्य जनतेला सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच्या हातात नसून तो केंद्राच्या अखत्यारीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times