गेल्या वर्षी देशात तब्बल २७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. याशिवाय त्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उत्पादित झालेले शंभर लाख टन साखर शिल्लक होते. म्हणजे ३७१ लाख टन देशात खपणार कसे, शिल्लक साखरेचे करायचे काय असा प्रश्न पडला होता. पण करोनाच्या संकटातही साखरेचा उठाव झाला. तरीही यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ११५ लाख टन साखर शिल्लक होते. दोन दिवसांपूर्वी देशातील एक दोन कारखाने वगळता इतर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम संपला. यावर्षी देशात ३०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये आघाडीवर आहेत. याशिवाय गतवर्षीची ११५ लाख टन साखर शिल्लक आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे साखर खपणार नाही, इतर देशातूनही मागणी येणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण यंदा देशातच २६० लाख टन खपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरअखेपर्यंत ही साखर देशातच खपेल. याशिवाय ६० लाख टन साखरेची निर्यात झाली असून अजून ५ ते ७ लाख टनाची निर्यात होण्याची शक्यता आहे.
वाचा:
शिल्लक साखर आणि विक्रमी उत्पादन यामुळे यंदा साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहील अशी भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र सप्टेंबरअखेरपर्यंत सव्वा तीनशे लाख टनापेक्षा अधिक साखर खपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा केवळ ९० ते ९५ लाख टन साखरच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जादा उत्पादन होऊनही साखर खपणार असल्याने या उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
देशातील साखर उत्पादन
एकूण उत्पादन ३०६ लाख टन
उत्तर प्रदेश ११०.६१ लाख टन
महाराष्ट्र १०६.२८ लाख टन
कर्नाटक ४१.६७ लाख टन
तामिळनाडू ६.७० लाख टन
इतर सर्व राज्ये ४१ लाख टन
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times