म. टा. प्रतिनिधी,

माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अश्या शब्दात राष्ट्रवादीचे नेते यांनी बीएचआर गैरव्यवहराच्या कारवाईचे समर्थन केले आहे. (my inquiry was not politically motivated then how bhr inquiry is political asks )

एकनाथ खडसे हे नुकतेच मुंबईहून जळगावात परतले. शुक्रवारी सकाळी ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी मत मांडले. बीएचआर प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीचे खडसेंनी स्वागत केले.

खडसे यांनी सांगीतले की, बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

क्लिक करा आणि वाचा-
खडसे यांनी पुढे सांगीतले की, बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो… माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अशा शब्दात खडसे यांनी विरोधकांनाही टोला लगावला.

क्लिक करा आणि वाचा-

अॅड. कीर्ती पाटलांच्या तक्रारीनुसार चौकशी

खडसे पुढे म्हणाले, बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी जळगावातील ॲड. कीर्ती पाटील यांनी २०१८ मध्ये केली होती. त्याच वेळी केंद्रीय सहकार मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने करावी, अशा सूचना केल्या होत्या. शेकडो लोकांनी ठेवीदारांच्या ठेवी नाममात्र दरात घेऊन आपली कर्जे मॅचिंगच्या माध्यमातून फेडल्याचे दर्शवले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून पात्रता नसताना अनेकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. त्यामुळे पतसंस्था डबघाईला गेली, असेही एकनाथ खडसे यांनी शेवटी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here