संभाव्य तिसऱ्या लाटेसंबंधी राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर डॉ. भोसले यांनी जिल्ह्याची बैठक घेऊन या तिसऱ्या लाटेसंबंधी सूचना केल्या. गावात संसर्ग रोखणारा हिवरे बाजार पॅटर्न दुसऱ्या लाटेच्या वेळी पुढे आला. त्यातून राज्याला योजना मिळाली. आता हाच पॅटर्न गावांसोबत शहरांतही राबवून संसर्गाला आळा घालणारे आणि रुग्ण संख्या मर्यादित ठेवणारे उपाय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती सांगताना ते म्हणाले की, टास्क फोर्सने जे अंदाज वर्तविले आहेत, त्यानुसार तिसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असणार आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ७५ हजार रुग्ण आढळले, दुसऱ्या लाटेत हा आकडा २ लाखांवर गेला आता तिसऱ्या लाटेत तो ४ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या लाटेत १५ मे हा ‘पीक डे’ होता. या दिवशी जिल्ह्यात ३० हजार २२१ उपचाराधीन रुग्ण होते. तिसऱ्या लाटेत हा अकडा ६० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी १२ टक्के, म्हणजे सुमारे ३ हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यावेळी ती ८ हजार रुग्णांना पडू शकते. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता प्राधान्याने केली पाहिजे. सर्व १४ तालुक्यांतील सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासोबत खासगी रुग्णांवरही लक्ष दिले पाहिजे. त्यांनीही आतापासून ऑक्सिजनची तयारी करावी. प्रकल्प उभारणे शक्य नसेल तर पुरेशी साठवण क्षमता करून आतापासून खरेदी करून ठेवावी. जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या तुलनेत कमी पडणार आहे.
वाचा:
दुसऱ्या लाटेत २०३ करोना रुग्णालये होती. तिसऱ्या लाटेत ती कमी पडतील. त्यामुळे तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल झाली पाहिजेत. सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी अशी व्यवस्था उभारली पाहिजे. मुळात चाचण्यांचे प्रमाण वाढवून वेळीच रुग्णांचा शोध घेतला आणि सुरुवातीच्या काळातच त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार झाले तर रुग्ण गंभीर होऊन पुढे दवाखान्यात आणि ऑक्सिजन बेडची गरज पडत नाही. त्यासाठी आता संख्या कमी होत असली तरी गहाळ न राहता काम सुरूच ठेवले पाहिजे. हिवरे बाजार पॅर्टनचा यासाठी उपयोग होऊ शकेल. गावांसोबत शहरांमध्ये तो कसा राबविता येईल, यावर संबंधितांनी लक्ष केंद्रित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times